प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमहिलांना लैंगिक संबंध वयाच्या किती वर्षापर्यंत करावेसे वाटतात

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. खरंतर तुमच्या या प्रश्नाचे एकच असे उत्तरच नाही. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तसं वयाचं बंधन निसर्गानं ठेवलेले नाही, मात्र वयानुसार लैंगिक ऊर्मीची तीव्रता कमी होत जाते व त्यामुळं लैंगिक संबंधाचं प्रमाणही ५० ते ६० वर्षानंतर साधारणत: कमी होतं. त्यातच काही आजार, त्यांची औषधं चालू असतील तर त्यामुळेही कामेच्छा कमी होऊ शकते. तसेच रजोनिवृत्तीनंतर (मासिक पाळी येणं बंद झाल्यावर) महिलांची कामेच्छा कमी होते ही चुकीची समजुत आहे. कारण रजोनिवृत्तीनंतर स्त्रीबीज निर्मिती थांबते पण याचा अर्थ असा नाही की कामेच्छा नाहीशी होते. ती तशीच असते.

तसेच कामेच्छा ही त्यावेळच्या त्यांच्या मानसिकतेवर, प्रकृतिस्वास्थ्यावर तसंच सवड व एकांत मिळण्याच्या संधीवर अवलंबून असते. एवढं मात्र खरं की, लैंगिक संबंधाची, मीलनाची ओढ असेल तर लैंगिक संबंधांना वयाचं बंधन आड येत नाही.

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 5 =