प्रश्नोत्तरेएखादी मुलगी दिसली कि खुप इच्छा होते येतो पण बायको जवळ आल्यावर तेवढा इच्छा का होत नाही?

1 उत्तर

नात्यातील तोच तोचपणा किंवा कंटाळा याला कारणीभूत असू शकतो. त्याचा परिणाम लैंगिक जीवनावर होणारच. आपला जोडीदार सोडून इतर स्त्री किंवा पुरुषाकडे आकर्षित होणे हे तसे नैसर्गिकच आहे. त्यात वावगे काही नाही परंतु त्या आकर्षणातून तसे संबंध प्रस्थापित केले गेले तर साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या आत्ताच्या नात्यावर होणारच. त्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

यावर उपाय मात्र आहे. आपले लैंगिक जीवन अधिक निरोगी, आनंददायी आणि एकमेकांना आवडेल, उत्तेजित करेल असे करा. एकमेकांशी संवाद साधा, आपल्या आवडी निवडी सांगा, तुम्हाला कशाने अधिक उत्तेजना मिळते ते सांगा आणि त्याप्रमाणे पण एकमेकांच्या संमतीने संबंध ठेवा. पहा तुम्हाला तशी उत्तेजना मिळेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 14 =