प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकधी अंडकोष खुप सैल पडते तर कधी खुप घट्ट होते असे का?

कधी अंडकोष खुप सैल पडते तर कधी खुप घट्ट होते असे का?

1 उत्तर

पुरुषांच्या अंडकोषांना वृषणही म्हणतात. पुरुषांना दोन वृषण असतात. हे वृषण त्वचेच्या पिशवीत (वृषणकोष) असतात. दोन्ही वृषण समान आकाराचे नसतात. एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं व थोडं खाली लोंबत असतं. वयात आल्यानंतर वृषणात टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होतं. वयात आल्यावर या संप्रेरकामुळे स्नायू बळकट होणं, आवाज बदलणं हे बदल होतात. याच संप्रेरकामुळे वृषणात पुरुष बीजं तयार होऊ लागतात व ही प्रक्रिया पुढे आयुष्यभर चालू राहते.
पुरुष बीजं तयार होण्यास विशिष्ट तापमान लागतं. हे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी असावं लागतं. म्हणून हे तापमान सांभाळण्यासाठी खूप थंडी असते तेंव्हा वृषणं शरीराच्या जवळ ओढली जातात व जेव्हा खूप उष्णता असते तेंव्हा वृषणं शरीरापासून दूर केली जातात म्हणजेच जास्ती खाली लोंबतात. विशेष म्हणजे जर वृशाणांना सातत्यानं जास्त तापमान जाणवलं, तर पुरुषबीजांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून मुलांना सैल चड्डी घालावी. कुस्ती/व्यायाम करणाऱ्यांनी लंगोट घातला तर व्यायाम झाल्यानंतर लंगोट काढून सैल चड्डी घालावी.
(‘मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातून हे उत्तर घेतले आहे. पुस्तकासाठी आम्हला संपर्क साधा)

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 1 =