गुद नाही गुदामैथुन हा जास्त बरोबर शब्द आहे. मैथुनाच्या अनेक प्रकारांमपैकी गुदामैथुन एक आहे. जसं हस्तमैथुन करुन तुम्ही लैंगिक सुख मिळवू शकता, ज्यामध्ये तुम्ही एकटे असाल तरी लैंगिक सुख मिळवता येतं. . मुखमैथुनामध्ये स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने म्हणजेच तोंडाने स्पर्श करून सुख देतात. पुरुषाचे लिंग जोडीदार तोंडात धरते किंवा स्त्रीच्या योनिला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तजना निर्माण केली जाते. या दोन्हींमध्ये गर्भधारणेची भिती नसते. लिंग-योनी मैथुनामध्ये पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनीमध्ये घातलं जातं. परंतू यामध्ये गर्भधारणेची शक्यता असते.
याचप्रकारे शौचाच्या(शीच्या) जागेतून म्हणजेच गुदामधून देखील संभोग करता येतो. स्त्री-पुरुष किंवा पुरुष-पुरुष या मैथुनाचा उपयोग करतात. याला गुदामैथुन असं म्हणतात. यामध्येदेखील गर्भधारणेची भिती नसते. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, योनीमार्गासारखां गुदामार्ग लवचिक नसतो. गुदामधून लिंग आत सरकवताना जखम होण्याची शक्यता असते, त्यामुळं योग्य ते वंगण वापरणं फायदेशीर राहतं. कोणत्याही मैथुनाच्यावेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं असतं.