प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी जेव्हा पण माझ्या शेजारच्या काकूंसोबत संभोग करताना बऱ्याचदा आधी योनीपण चाटतो, याने काही अपाय होऊ शकतो का??

1 उत्तर
Answer for चाटणे answered 7 years ago

मित्रा, तुझ्या प्रश्नाचे नेमके उत्तर द्यायचे झाल्यास, जोडीदाराच्या संमतीने मुखमैथुन केले तर काहीच होत नाही. जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. तसेच हे योनीतून येणारा स्राव तोंडावाटे शरीरात गेला तरीही तो शरीरासाठी हानिकारक नसतो. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे. याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट वर चर्चिली आहेत, ती नक्की वाचा.

पण फक्त एवढं सांगून उत्तर पूर्ण होणार नाही. मित्रा, लैंगिक इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यात फरक आहे. सेक्स ही एक जबादार क्रिया आहे हे विसरू नकोस. लैंगिक कृतीमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि आदर तितकाच महत्वाचा आहे. जरी वाहिनीची तशी इच्छा असेल आणि तिने ती व्यक्त केली तरीही खालील गोष्टींचा दोघं मिळून विचार करा.

१. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या वहीणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

जे काही कराल ते परस्पर संमतीने आणि जबाबदारी घेऊनच करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 11 =