प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsनवरा-बायकोतील सेक्स म्हणजे प्रेम असतं का? की सेक्स म्हणजे फक्त एक जैविक क्रिया असते?

1 उत्तर

खूपच चांगला प्रश्न आहे आणि खूप अवघड ही. मला वाटतं यात दोन्ही श्यक्यता आहेत. आपल्या इथे सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने लग्नासाठी जोडीदारांची निवड केली जाते, लग्न जमवले, लावले आणि निभावले जातात त्यावरून प्रत्येक लग्न संबंधांमध्ये प्रेम असेलच असे नाही आणि नसेल असेही नाही.
सेक्स हा जसा प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक मार्गांपैकी अगदी वैयक्तिक स्वरूपाचा असा एक मार्ग आहे तसाच तो दोन किंवा अधिक व्यक्ती शरीराची गरज अथवा व्यवहार म्हणूनही करू शकतात किंवा करतात. मग ते एखादं जोडपं असो किंवा पती-पत्नी असोत किंवा शरीर विक्रय करणरे स्त्री/पुरुष आणि त्यांचे गिर्हाईक असोत. त्यांची एकमेकांशी तुलना करण्याची काही गरज नाही.
लग्न झाले म्हणजे नवरा-बायकोत प्रेम असतेच असे नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता, या नात्यात काळजी, जबाबदारी, आदर आणि संमती यांचा अंतर्भाव आहे का, तुमची एकमेकात किती भावनिक गुंतवणूक आहे आणि तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करता यावर प्रेम अवलंबून असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 13 =