प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपत्नीने लग्नाअगोदर सेक्स केला आहे का हे कसे ओळखावे

माझे लग्न झाले आहे.पत्नीने लग्नाअगोदर सेक्स केला आहे हे कसे ओळखायचे.

1 उत्तर

ज्या व्यक्तींनी एकमेकांशी संभोग केला आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही त्यांनी केलेला संभोग नुसत्या पाहण्यावरुन कळणार नाही. ज्यांनी संभोग केला आहे त्य़ांनी स्वतःहून कोणाला सांगितलं किंवा त्यांना संभोग करताना कोणी स्वत: पाहिलं तरच कळू शकेल. लैंगिक अवयवांकडे पाहून कोणताही अंदाज बांधणं कठीण आहे. हे झालं तुमच्या प्रश्नाचं तांत्रिक उत्तर.

आता तुमच्या प्रश्नातील मुख्य गोष्टीकडे वळू या.पत्नीने लग्नापूर्वी केलेल्या संभोगाबद्दल तुम्हाला माहिती का हवी आहे? यातून तुम्ही नक्की काय सिध्द करणार आहात? लग्नापूर्वी केलेला संभोग हा त्याच्या खाजगीपणाचा भाग आहे. तो त्यांनी स्वतःहून सांगितला तर ठिक अन्यथा त्याच्याबद्दल जबरदस्तीने माहिती काढून घेणं हा अत्याचारच आहे. आपल्याच समाजामध्ये पुरुषांनी लग्नापूर्वी केलेला संभोग हा अनैतिक मानला जात नाही किंवा त्याचा पुढील आयुष्यावर खूप विशेष असा परिणाम होत नाही. मात्र स्त्रीयांच्या लैंगिकतेवर काटेकोरपणे बंधनं लादली जातात. त्याचे गंभीर परिणाम पुरुषांकडून किंवा पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून त्यांना भोगावे लागतात. आजच्या विद्न्यान युगात हे अतार्किक आणि अमानवी आहे. यापेक्षा तुम्ही तुमच्या दोघांच्या पुढील आयुष्याबद्दल विचार कराल तर जास्त फायदेशीर राहिल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 1 =