प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळीच्या किती दिवस अगोदर निरोध न वापरता किंवा गोळ्या न खाता संबध ठेवल्यास स्त्री गरोधर राहत नाही.

1 उत्तर

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याच्या संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. या विषयी अधिक माहिती गर्भधारणा नक्की कशी होते या लेखामध्ये दिली आहे.
शक्यतो मासिक पाळी चालू असताना गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर पाळीचं चक्र लहान असेल म्हणजेच जर पाळी तीन आठवड्यातच येत असेल तर कधी कधी पाळी संपता संपताच अंडोत्सर्जन होतं. त्यामुळे पाळीच्या काळात सेक्स केल्यावर गर्भधारणा होणारच नाही असं नक्की सांगता येत नाही. पाळी जर महिन्यानी किंवा त्याहून जास्त दिवसांनी येत असेल तर मात्र पाळीच्या काळात दिवस जाण्याची शक्यता नसते.
आपलं पाळी चक्र समजून घेतलं तर कोणत्या काळात दिवस जाऊ शकतात आणि ते कसं टाळता येईल हे ठरवता येऊ शकतं. मात्र कधी कधी हे अंदाज चुकू शकतात. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी आणखी काय उपाय करता येतात याची माहिती नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी या लेखात दिली आहे. ती नक्की वाचा.
जोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाही, तोपर्येत निरोध किंवा इतर गर्भनिरोधक पद्धत वापरा आणि प्रेग्नन्सी राहील का ही चिंता मनातून काढून टाका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 13 =