लिंगावरील कातडी मागे सरत नसल्यास ओप्रशन करणे गरजेचे आहे का । प्रयन्त केल्यास खूप वेदना होतात। मी एकदा पुण्यात पेठेत गेलो होतो पण डबल कंडोम किंवा पहिलीच वेळ असल्यामुळे काही काम झाले नाही। ऑपरेशन करायचे झाल्यास घरी माहिती न देता पुण्यात करता येईल का ।
या शस्त्रक्रियेत लपवण्यासारखे काही नाही मित्रा. साधे ऑपरेशन आहे ज्याला अधिक काळ दवाखान्यात घालवावाही लागत नाही. तुझ्याच शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ही सर्जरी होण्यात काही अडचण नाही. एखाद्या त्वचा तज्ञाला भेट. पुण्यात ही सर्जरी होईलच. आणि हो, पेठेत गेल्यास कंडोम वापरतोस हे चांगले आहे.
खालील लिंक वरील उत्तर वाच. मदत होईल.