प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsब्रम्हचर्य हेच जीवन व विर्यनाश हाच मृत्यू असे स्वामी शिवानंदजींचे एक पुस्तक आहे त्याप्रमाणे वीर्य जर नष्ट झाले तर खूप मोठी हानी सांगितली आहे ब्रम्हचर्य व विर्यशक्ती काय आहे त्यावर माहीती द्यावी सर

1 उत्तर

अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुमचा स्वतःचा वैज्ञानिक दृष्टीकोन खूप उपयोगी पडतो. हे पुस्तक कोणत्या काळात? आणि कशासाठी लिहिलं गेलं आहे याची कारणं शोधू शकता. ब्रम्हचर्य ही एक जीवन जगण्याची पध्दत काही लोकांची असू शकते. परंतू ती प्रत्येकाने स्विकारलीच पाहिजे असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. त्यामुळे ब्रम्हचर्य ही वैयक्तिक बाब असू शकते .

वीर्य जर नष्ट झाले तर काही हानी होत नाही, विर्यनाश ही चुकीची धारणा आहे हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. शरीरातील इतर स्त्रावाप्रमाणेच विर्याची सतत निर्मिती होत असते अन त्याचे वेळोवेळी पतनही होत असते (हस्तमैथून, संभोग किंवा स्वप्नावस्थेमध्येही ). ब्रम्हचर्य की विर्यनाश यापेक्षा शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्वाचं आहे. लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल तर निसंकोचपणे योग्य मार्गाने विर्यपतन झाले तर काय बिघडणार आहे.

बाकी ब्रम्हचर्य व विर्यशक्ती बाबतची माहिती शिवानंदजींच्या पुस्तकात पाहा व वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून व चिकित्सात्मक वृत्तीने त्याचा उहापोह ही करा. शुभेच्छा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 18 =