हो, हे तुम्ही आई वडिलांना सांगणं उत्तम ठरेल. पण त्याही अगोदर तुम्ही तुमच्या बहिणीशीच बोललात तर अधिक चांगलं होईल असं वाटतं. तिच्या ह्या कृतीबद्दल तुमची नापसंती तुम्ही स्पष्टपणे तिला सांगा. कदाचित ती परत असं करणार नाही. कुठल्याही दबावाला जुमानायाची गरज नाही. शिवाय तुम्ही हे सर्व आई-वडिलांपर्यंत पोचवू शकता हेही तिला सांगा.
आपल्याला जे आवडत नाही अथवा आपल्या मनाविरुध्द किंवा मर्जीविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना स्पष्ट आणि ठाम शब्दांत नकार देणं कधीही चांगलंच. तरीही जर तुमची बहिण ऐकत नसेल तर पालकांजवळ ह्याची तक्रार करा.
भाऊ-बहिणी सारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाज मान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा तुम्ही योग्य वेळी प्रश्न केला आहे आणि लवकर योग्य तो निर्णयही घ्या. काळजी घ्या.