सर माझी एक मैत्रीण बेस्ट फ्रेंड आहे … तिच्याशी बोलल्या शिवाय मला दिवस नीट जात नाही … तिला माझे सगळे सेक्रेटस माहीत आहेत । मी तिच्या कडून काही लपवत ही नाही ..मी तिला क्रश बदल ही सांगितलं आहे… तिझ्यात आणि माझ्यात एवडी घनिष्ठ मैत्री असू शकते का ..?मी काय करावे कृपया सविस्तर सांगा …!****
तुमच्या दोघांमध्ये निश्चितच एवढी छान घट्ट मैत्री असू शकते आणि त्यात काहीच गैर नाही. तुझ्या मनात मैत्री पलीकडे जाऊन इतर काही भावना आहेत का याचा विचार कर. तसं असेल तर त्या समजून घे, व्यक्त कर. तसं नसेल तर आहे ते नातं खूप छान आहे. वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. तुला अजून काही विचारायचं असेल तर नक्की विचार.