प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनी स्वच्छता

1 उत्तर

योनीची नियमित स्वच्छता राखणं आवश्यक आहे. कोणताही साबण न वापरता स्वच्छ पाण्याने योनीची स्वच्छता केलेली नेहमीच फायदेशीर राहते. अनेकवेळा साबण किंवा तस्तम रसायनयुक्त गोष्टींचा वापर केल्यामुळे संप्रेरकांचं संतुलन बिघडू शकतं. योनीच्या आजूबाजूचा भाग साबणाने धुतला तरी चालेल मात्र योनीच्या आतमध्ये तो जावू नये ही काळजी घ्यावी. योनीची स्वच्छता ठेवण्यासाठी शरीरात विविध संप्रेरक काम करत असतात. विविध स्त्राव योनीमार्गातून शरीर सोडत असतं. पाढंरा स्त्राव योनीमधून जात असतो तो सतत साफ केला पाहिजे. पाळीच्या काळात येणारं रक्त योनीच्या आसपास जास्त काळ राहिलं तर त्या रक्तांवर विविध किटाणू वाढू शकतात. त्यामुळं मासिक पाळीच्या काळात विशेष काळजी घेवून योनीची स्वच्छता राखली पाहिजे. महत्वाचं म्हणजे योनी आणि गुदद्वारामध्ये खूप कमी अंतर असल्यामुळे गुदद्वाराची स्वच्छता करताना ती योनीच्या विरुध्द दिशेने करावी.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 9 =