तुमच्या प्रश्नातून तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे ते स्पष्ट होत नाही. नेमकी काय अडचण येत आहे हे स्पष्टपणे सांगू शकलात आणि प्रश्न सविस्तरपणे विचारलात तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं सोपं जाईल.
पहिला वाहिला सेक्स करत असताना साधारणपणे कोणती माहिती असणं आवश्यक आहे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची काही माहिती देत आहोत त्याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. पण या माहितीतून तुमच्या प्रश्नांचं निरसन झालं नाही तर तुमचा प्रश्न पुन्हा विचारा.
अगोदर एकमेकांची चांगली ओळख करून घ्या. बोला. एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. घाईची आवश्यकता नाही. शरीर संबंध, गर्भधारणा, निरोधन ह्या बद्दल दोघांनी मिळून माहिती मिळवा, एकमेकांना सांगा, विचारा. मूल कधी हवे आहे, हवे की नको, कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर एकमेकांची मतं जाणून घ्या, त्यांचा आदर करा. गर्भ निरोधानावर सल्ला घ्या.
पहिला वहिला अनुभव महत्वाचा असतो. दीर्घकाल लक्षात राहतो. तो चांगल्या अर्थाने स्मरणात रहावा असे वाटत असेल तर वरील मुद्द्यावर अंमलबजावणी करा. असाच एक प्रश्न वेबसाईटवर चर्चिला आहे तो वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..