प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिगांवरची त्वचा खाली होत नाही. मला उपाय सांगा. पुर्ण पणे लिंगा वरती आहे माझे वय 25 आहे लहान पणा पासुन तत्वचा लिंगावरती अविवाहित आहे मला सभोगा साठी त्रास होणार नाही ना ??मला उपाय सांगा
1 उत्तर

लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर समस्या होईलच असं नाही. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही.

हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर अशी त्वचा छोटी शस्त्रक्रिया करुन काढून टाकता येते. याला सुंता करणं असं म्हटंल जातं. मात्र यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच मदत घ्यावी. कारण शस्त्रक्रियेमध्ये स्वच्छता महत्वाची असते. अन्यथा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 5 =