तुमच्या प्रश्नांची उत्तरे एक एक करुन पाहून या.
१. वीर्य किंवा लघवी पिणे
यात गैर काही नाही. मात्र या गोष्टीं दोघांच्याही संमंतीनं होणं आवश्यक आहे. अनेकवेळा पुरुष पॉर्नक्लिपमधील नकली दृष्य पाहून जोडीदारालाही अशा गोष्टी करायला सांगतात. त्यामुळं जोडीदाराला तुमच्याविषयी अनादर वाटू शकतो. यापेक्षा जोडीदाराशी लैंगिक क्रियेबद्दलचा मोकळा संवाद सुरु करा. ज्यावेळी जोडीदाराला अशा गोष्टी करणं सुखकारक वाटेल त्याचवेळी करा.
२. गुदामैथुन
गुदामैथुन करण्यामध्ये गैर काही नाही. वरील उत्तराप्रमाणेच जोडीदाराची संमंती असणं खूप महत्वाचं आहे. याव्यतिरिक्त गुदामैथुन करताना नेहमी लक्षात ठेवा, गुदद्वार योनीसारखे लवचिक नसते. त्यामुळं गुदामैथुन करताना दोघानांही जास्त त्रास होवू शकतो. यासाठी चांगल्याप्रकारची वंगणं वापरणं फायदेशीर ठरतं. थुंकीदेखील एक प्रकारचं वंगण आहे.
३. बगल किंवा योनी चाटणे
अशा लैंगिक क्रियांमध्ये स्वच्छता असणं फार महत्वाचं आहे. अन्यथ जोडीदाराला त्याची किळस निर्माण होवू शकते. कोणत्याही लैंगिक कृती करण्यासाठी जोडीदाराची समंती असणं आवश्यक आहे.
या किंवा अशा कोणत्याही लैंगिक क्रिया करताना त्यांच्या सुखकारक परिणांमांसाठी जोडीदाराशी मोकळा संवाद हवा. त्याची सुरुवात तुम्ही केली तर जोडीदार त्याला प्रतिसाद देवू शकेल.