पेठेत जाऊन वीर्यपतन झाली नाही याचा अर्थ वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रीकडं जाऊन तिच्याशी संभोग केल्यानंतर वीर्यपतन झालं नाही असा अर्थ घेऊन उत्तर लिहित आहोत.
१) हस्तमैथुन करण्याचा आणि प्रत्यक्ष संभोग करण्याच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. जर तुम्ही प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी दोन-तीन वेळा हस्तमैथुन केलं असेल तर वीर्यपतन होण्यास उशीर होऊ शकतो. किंवा कदाचित पहिल्यांदा संभोग करात असाल तर भितीमुळं देखील असं होऊ शकतं. कदाचित वेश्या गल्लीतील पोलीस येण्याच्या भितीमुळंदेखील अनेक तरुण मुलग्यांना हा अनुभव आलेला आहे.
२) हस्तमैथुनामुळं संभोगाचा कालावधी आणि ताकद अजिबात कमी-जास्त होत नाही.
३) प्रश्नातील शेवटचा भाग. एका वेळी एकाच कंडोमचा वापर करण योग्य असतं. दोन कंडोम वापरल्यामुळं ते फाटण्याची शक्यता वाढते. कंडोमची ताण क्षमता चांगली असते. मात्र तो योग्य पध्दतीनं लिंगावर लावला गेला पाहिजे. कंडोमच्या वापरासंबंधीची माहिती पाकिटावर दिलेली असते.
हे लक्षात ठेवा. वेश्या व्यवसायामध्ये येणार्या अनेक स्त्रीयांना जबरदस्तीनं आणलं जातं. वेश्यांसोबत संभोग करताना त्याची जाणीव असावी. शिवाय़ वेश्यांसोबत संभोग करताना लिंगसांसर्गिक आणि एच.आय.व्ही.ची लागण न होण्यासाठी कंडोम वापरणं खूप जास्त फायदेशीर असतं.