नात्यांचे लिखित असे खूप काही नियम नसतात. कायद्यात असतील तेवढेच. समाजाने घालून दिलेले अलिखित नियम मात्र अनेक असतात. सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण, प्रदेश या नुसार त्यातही फरक पडतो. अनेक वेळेस हे अलिखित नियमच सर्व नाते संबंध नियंत्रित करताना दिसतात. नात्यांमध्ये कुठे अधिक मोकळेपणा दिसून येतो तर कुठे साचेबद्ध बंदिस्तपणा. परंतु मुख्यतः आपल्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल ज्या भावना असतात त्यावरून नातेसम्बन्ध ठरतात. अनेक ठिकाणी, विशेषतः लोकप्रिय माध्यमांमध्ये वाहिनी दिराचे नाते कधी आई-मुलाचे, बहिण-भावाचे, मित्र-मैत्रिणीचे दिसते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर एकापरीने सोपे आहे. लैंगिकतेची जी मूल्य ही वेबसाईट जपण्याचा प्रयत्न करते त्यात संमती, खाजगीपणा, विश्वास, परस्पर आदर आणि सुरक्षितता यांचा अंतर्भाव आहे. कुठल्याही नात्यात त्यातही लैंगिक संबंध जिथे असतील तिथे या मुल्यांचा स्वीकार आचार विचारात असावा असं आम्हाला वाटतं. मग ते नातं मित्र मैत्रिणीचं असू दे अथवा वाहिनी दिराचं. तुम्हाला उत्तर थोडं अवघड वाटेल पण त्याला काही इलाज नाही. विचार करा..