प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्रीचे स्तन

स्त्रीच स्तंनामधील दुधाची चव कशी लागते. आणि तिच्या एका स्तनाला किती दुध येते तसेच बाळ निप्पल तोंडात घेऊन दुध पित असतांना तिला उत्तेजना येते का ???

1 उत्तर
Answer for स्त्री answered 7 years ago

स्त्रीच स्तंनामधील दुधाची चव कशी लागते. आणि तिच्या एका स्तनाला किती दुध येते तसेच बाळ निप्पल तोंडात घेऊन दुध पित असतांना तिला उत्तेजना येते का ???

स्तनातून येणाऱ्या दुधाची चव गोड, जिभेला सुखद वाटणारी अशी असते असं म्हणतात. पण प्रत्येकासाठी याबाबतील अनुभव वेगळा असतो. कोणतीही चव आपली अनुवंशिकता, आपली संस्कृती आणि आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे खाद्यपदार्थ खाल्ले आहेत त्यानुसार वेळोवेळी विकसित होते. त्यामुळे दुधाची चवदेखील इतर कोणत्याही अन्नपदार्थाप्रमाणे, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा प्रकारचा अनुभव येऊ शकतो. असो.

आता राहिला प्रश्न हे दुध प्यायचे की नाही किंवा स्त्रीला ते आवडते की नाही. याचे आपण एक असे उत्तर देऊ शकणार नाही. कारण हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही. बाळाच्या पोषणासाठी निसर्गतः स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते. हे बाळाचे अन्न असल्याने त्याचे काही दुष्परिणाम नाहीत, यात काही शंका नाही.

आता तुमचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न बाळ दुध पीत असताना स्त्रीला संभोग करावासा वाटतो का किंवा ती उत्तेजित होते का? याचेही नेमके उत्तर देणे अवघड आहे. साधारतः एखद्या व्यक्तीच्या मनात लैंगिक इच्छा निर्माण झाली की तिला लैंगिक उत्तेजना मिळते आणि संभोग करावासा वाटतो. कोणाच्या मनात कशामुळे लैंगिक इच्छा होणार हे आपण कसे ठरविणार?

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 1 =