3x मूव्हीमध्ये म्हणजेच पोर्न फिल्म किंवा ब्लू फिल्ममध्ये जे करतात त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतात तर काही भासवल्या जातात. त्यात दाखवलेले लैंगिक संबंध, वेगवेगळ्या लैंगिक क्रिया, दोन किंवा अधिक जणांनी केलेल्या लैंगिक क्रिया घडवून आणलेल्या किंवा उत्तेजना वाढवणाऱ्या असतात. त्या खऱ्याही असतात. उगाच दो पक्षी, झाडं, फुलं असं काही तरी दाखवत बसण्यापेक्षा जे जसं घडतं तसं या फिल्म्समध्ये दाखवतात. त्या दृष्टीने हे चित्रण खरं असतं.
मात्र अशा फिल्ममधल्या स्त्रिया किंवा पुरुषांची शरीरं, त्याची मापं, त्याचे आकार मात्र कधी कधी खरे नसतात बरं का. माणसाच्या मनातल्या सेक्सविषयीच्या कल्पनांमध्ये अतिरंजित पद्धतीने स्त्रीचं किंवा पुरुषाचं शरीर असतं आणि त्याचाच फायदा या फिल्म्स घेतात. किंवा कधी कधी त्यातल्या लैंगिक क्रियांमध्ये ज्या पद्धतीची जबरदस्ती किंवा बळाचा वापर दाखवला जातो तो काही खरा प्रणय किंवा सेक्स नाही. एकमेकांना दुखावणं, रडवणं, मारहाण करणं, हिंसेचा वापर करणं ही चांगल्या सेक्सची लक्षणं नाहीत. त्यामुळे या फिल्म्समधले असे संबंध पाहून प्रत्यक्षातही सेक्स तसंच असतं असं वाटून घेऊ नका.
पहायला चांगलं वाटतं, उत्तेजना मिळते, मज्जा येते अशा कारणांनी या फिल्म्स पाहत असाल तर काही हरकत नाही. पण त्यात होतं तसं सगळं खऱ्याखुऱ्या जोडीदारासोबत करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र निराशा हाती लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पहा पण प्रेमानेच्या धर्तीवर जे काही कराल ते प्रेमानेच…
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा