Disclaimer

लैंगिकता शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. तसेच लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा हा देखील या वेब साईटचा उद्देश आहे. या साइटवरील विषय आणि आशय १६ वर्षांपुढील व्यक्तींसाठी योग्य आहे. ही वेबसाइट ‘तथापि ट्रस्ट – स्त्रिया आणि आरोग्य संसाधन केंद्राने’ तयार केली आहे. लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हाही या वेबसाइटचा उद्देश आहे. कोणत्याही स्वरुपातील हिंसा, जबरदस्ती, लैंगिक छळ, बलात्कार, छेडछाड, बालकांचं लैंगिक शोषण किंवा कुणाच्याही संमतीविरोधात केलेलं अश्लील चित्रण आणि त्याचं प्रसारण याचा आम्ही निषेध करतो. लहान मुले-मुली आणि स्त्रियांवरील हिंसेला आणि अशा हिंसेला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही कृतीला, प्रसारणाला, चित्रणाला आमचा सक्त विरोध आहे. जात, धर्म, लिंग, लैंगिकता, भाषा, प्रांत, शारीरिक किंवा मानसिक क्षमता अशा कोणत्याही आधारावर केला जाणारा भेदभाव आम्हाला मान्य नाही.

प्रत्येकाची लैंगिकता आणि तिची अभिव्यक्ती वेगवेगळी असते, ती ठरवण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीचा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. वाढत्या वयात योग्य पद्धतीने लैंगिकतेची माहिती मिळणं आणि त्याबद्दल एक चांगली, निकोप भावना किशोरवयीन आणि तरुणांच्या मनात तयार होणं गरजेचं आहे.

या साइटवरील मजकूर ना नफा तत्त्वावर कुणीही वापरू शकेल. असा वापर करताना, ‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’ असा उल्लेख करावा. साइटवरील चित्रं, फोटो, पोस्टर, फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात अशी आमची इच्छा आहे. या सर्वांचा वापर ना नफा उपक्रमांसाठी करता येईल. मात्र वरीलप्रमाणे उल्लेख करूनच हे साहित्य वापरण्यात यावे. साइटवर आलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं, इतरांनी केलेलं लेखन, त्यावरील कमेंट्स यातील प्रत्येक विचाराशी संस्था सहमत असेलच असं नाही. काही आशय बाद करण्याचा, संपादित करण्याचा प्रसिद्ध न करण्याचा किंवा राखून ठेवण्याचा अधिकार संस्थेकडे आहे.