जननचक्राची ओळख – भाग ३ : ग्रीवेतील बदल

गर्भाशयाच्या मुखामध्ये म्हणजेच ग्रीवेमध्ये होणारे बदल

बहुतेक स्त्रियांच्या ओटीपोटात गर्भाशय असते. त्याला खाली योनीमार्ग जोडलेला असतो आणि दोन्ही बाजूला बीजकोष असतात. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसते किंवा उलटे किंवा तिरपे असते. गर्भाशयाचं तोंड योनीमार्गात उघडतं. त्याला ग्रीवा म्हणतात. पाळीचक्रामध्ये ग्रीवेमध्ये बदल होत असतात. या बदलांवरून जननक्षम दिवस ओळखता येतात. (वरील चित्रामध्ये पाळी चक्रात ग्रीवेमध्ये काय बदल होतात याचा आढावा घेतला आहे.)

ग्रीवेतील बदल समजून घेण्यासाठी उकिडवे बसून किंवा एक पाय खुर्चीवर ठेऊन उभे रहावे. योनीमार्गातून बोट आत घालून ग्रीवेला स्पर्श करावा. हात स्वच्छ धुतलेला असावा आणि बोटाची नखं कापलेली असावीत.

Touching cervix

  • कधी कधी ग्रीवेला सहज स्पर्श करता येतो. ग्रीवा जर घट्ट आणि बंद असते. म्हणजे हा काळ जननक्षम नाही.
  • कधी कधी ग्रीवा बोटाला लागत नाही, लागली तरी तिचा स्पर्श मऊसर असतो, ग्रीवा उघडलेली असते आणि ओलसर असते. म्हणजे  हा काळ जननक्षम म्हणजेच गर्भधारणेला पोषक असतो.
  • Feel noseग्रीवेचा स्पर्श मऊ आहे का घट्ट हे समजून घेण्यासाठी – बोटाने आधी नाकाच्या शेंड्याला स्पर्श करा. आणि नंतर खालच्या ओठाला स्पर्श करा.
    नाकाचा शेंडा थोडा घट्ट आणि कठीण जाणवतो. कानाचा वरचा भाग आणि कानाची पाळी यांना स्पर्श करा. कानाची पाळी मऊसर लागते.

ग्रीवेच्या स्पर्शातील फरक समजून घेण्यासाठी थोडा सराव आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यावर शौचाला गेल्यावर आधी हात स्वच्छ धुऊन ग्रीवेचा स्पर्श कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक महिनाभर असा सराव केल्यानंतर ग्रीवेमध्ये काय बदल होतात हे तुम्हाला लक्षात येईल.

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. सचीन says:

    मुलीने आधी शरीरसंबंध ठेवले आहे हे कळेल का

    • I सोच says:

      हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.
      स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.अधिक माहितीसाठी खलील लिंक वरील लेख वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap