प्रश्नोत्तरेअंडोत्सर्जन म्हणजे काय ?

1 उत्तर

तुम्हाला कदाचित ‘अंडोत्सर्जन म्हणजे काय?’ असं विचारायचं असावं असं समजून उत्तर देत आहे. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 9 =