आजपर्यंत एड्स बद्दल खूप ऐकलंय, पण अजून काही उत्तरे मिळाली नाहीत.. एड्स का होतो? ? मला आणि माझ्या पार्टनर ला एड्स नाहीये पण जर आम्ही निरोध न लावता सेक्स केले तर आम्हा दोघांपैकी कोणाला एड्स होऊ शकतो का? ?
आपण एड्स विषयी ऐकले आहे हे महत्वाचे आहे. तरीही काही बाबींची अधिक स्पष्टता यावी म्हणून आपण प्रश्न विचारला याबद्दल कौतुक.
आपणाला माहित आहे असेल की, ह्युमन इम्यूनो डिफीसियन्सी व्हायरस (Human Immuno Deficiency Virus) – एच. आय. व्ही. या विषाणू मुळे एड्स ( Acquired Immuno Deficiency Syndrome ) हा आजार होतो. याचे ‘एड्स’ हे संक्षिप्त नाव आहे. शिवाय कोणत्याही व्यक्तीला एच. आय. व्ही. ची लागण खालील चार प्रमुख कारणांनी होते. यामध्ये –
१. असुरक्षित लैंगिक संबंध – म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत निरोध न वापरता केलेला संभोग.
२. एच. आय.व्ही. चाचणी न केलेले रक्त किंवा रक्त घटक घेणे.
३. शिरेवाटे घेण्यात येणाऱ्या मादक पदार्थांचे सेवन करतांना सुई व सिरींजचा सामुहिक वापर.
४. एच. आय. व्ही. संसर्गित मातेकडून तिच्या जन्मणाऱ्या बाळास
निरोधचा वापर लैंगिक आजारापासून सुरक्षितता याशिवाय कुटुंब नियोजनाचे साधन आणि दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी केला जातो. म्हणजेच विश्वासू, एच.आय.व्ही. चा संसर्ग न झालेल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठवल्याने एच.आय.व्ही. ची लागण होण्याची शक्यता अजिबातच नाही. यासाठी गरजेची आहे दोघांची एकमेकांप्रती असलेली एकनिष्ठता. शिवाय मुद्दाम नोंदवावेसे वाटते कि, एड्स चे निदान रुग्णांनी नव्हे तर डॉक्टरांनी केले पाहिजे.
आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनात लैंगिक संबंध आणि एच.आय.व्ही. चा संसर्ग याविषयी ‘भितीयुक्त शंका’ डोकावते. कारण एच. आय.व्ही. संक्रमणाच्या सर्व मार्गांपैकी लैंगिक मार्ग एक प्रमुख मार्ग आहे. व्यक्तीच्या जीवनात संभोग क्रिया, रक्त किंवा इंजेक्शन यांच्या तुलनेत अधिक वेळा घडत असते. म्हणूनच एच. आय. व्ही. च्या प्रतिबंधासाठी गरज जोडीदारांमधील परस्पर विश्वास आणि संवादाची.
एकही लडकी के साथ बार बार संक्रमण करने से एड्स होता हे क्या?
BAR BAR US LADAKI KISS KARANE SE HIV HOTA HAI KYA USAKO KUCHH AISA HIV HAI YA NAHI BALKI — USE KISS KIYA GAYA TO JO LADAKA HAI — USE USAKA KUCHH ESHUHO SAKATA HAI KYA
Mukh maithun kelyane hoto ka
माझ्या मित्राने त्याचे लग्न झाले असताना सुद्धा दुसऱ्या लग्न झालेल्या मुलीबरोबर बिना निरोध चा सेक्स केला पण त्याच्या बायकोला आणि लग्न झालेल्या मुलीला एड्स नाही तर त्याला होऊ शकतो का उत्तर
एकही लडकी के साथ बार बार sex करने से एड्स होता हे क्या?