एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या संसर्गामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट व्हायला लागते. याचा परिणाम म्हणजेच शरीर कोणत्याही प्रकारच्या जंतुलागणीचा मुकाबला करू शकत नाही. औषधे न घेतल्यास एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.
एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (योनिमैथुन आणि गुदमैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

  • एचआयव्ही असलेले रक्त लागलेल्या निर्जंतुक  न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
  • एचआयव्ही असलेले रक्त  दुसऱ्या व्यक्तीस दिले  गेल्यास आणि
  • गर्भवतीला एचआयव्ही असेल तर तिच्या पोटातल्या बाळाला गर्भारपणात, बाळंतपणात किंवा आईच्या दुधातून एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

लक्षणं

एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं

एचआयव्हीची आधीची लक्षणं साध्या सर्दी-तापासारखी असतात. ताप, अंगदुखी, खोकला, इत्यादी. असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत पुढील लक्षणं जाणवू लागली तर एचआयव्ही तपासणी करणं गरजेचं आहे.

  • ताप, डोकेदुखी
  • जुलाब
  • अंगावर रॅश, पुरळ

एचआयव्हीची लागण नसेल तर ही लक्षणं कसल्याही उपचराशिवाय जाऊ शकतात. मात्र लागण झाली असेल तर ही लक्षणं कित्येक महिने तशीच राहतात. आणि हळूहळू शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट करतात.

एड्सची लक्षणं

  • वजनात प्रचंड घट
  • भूक न लागणे
  • सतत जुलाब
  • त्वचेचा कॅन्सर
  • मेंदूज्वर
  • क्षयरोग
निदान कसं करायचं?

एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान तीन महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर काहीवेळा ही प्रतिद्रव्ये दिसून येत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

उपचार

एचआयव्हीवर कोणताही इलाज नाही. मात्र जीवनशैलीत आवश्यक बदल केले तर एचआयव्हीची लागण झाल्यानंतरही व्यक्ती संपूर्ण आयुष्य व्यवस्थित राहू शकते. सध्याच्या औषधांमुळे एड्सची अवस्था टाळता येऊ शकते. या औषधांना अण्टीरेट्रोव्हायरल औषधे म्हणतात. ही औषधं विषाणूची वाढ थोपवतात.

एचआयव्ही होऊ नये म्हणून – 

लैंगिक संबंधातून लागण टाळण्यासाठी: 

  • निरोधचा वापर
  • एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा. किंवा असे संबंध नेहमी निरोधचा वापर करूनच ठेवा.
  • पुरुषांमध्ये सुंता केल्याने म्हणजेच लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकल्याने लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याचा धोका ५०  टक्क्यांनी कमी होतो.
  • जननेंद्रियांवर फोड, व्रण, अनियमित स्राव किंवा वेदना असेल तर तपासणी करून घ्या. इतर कोणते लिंगसांसर्गिक आजार असतील तर एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

रक्तातून लागण होऊ नये म्हणून : 

  • शरीरात रक्त भरताना ते अधिकृत रक्तपेढीतूनच घ्या. रक्ताची एचआयव्ही तपासणी झाली आहे का नाही हे तपासून बघा. रक्ताच्या पिशवीवर त्या रक्तावर केलेल्या सर्व तपासण्यांची नोंद असते.
  • निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर कटाक्षाने टाळा. प्रत्येक वेळी नवीन सुई वापरा.
  • एकमेकांच्या इंजेक्शन्स किंवा सुया वापरू नका. शिरेतून नशा घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास करून महत्त्वाचं आहे.

आईकडून बाळाला लागण होऊ नये म्हणून : 

  • आईला एचआयव्ही असेल तर गरोदरपणी एआरटी औषधे सुरु करावीत. आधीपासून औषधे सुरु असली तर ती न थांबवता सुरुच ठेवावीत. योग्य औषधोपचार  मिळाले तर बाळाला एचआयव्हीची लागण होण्याची जवळजवळ शक्यता नसते.
हे समजून घ्या

आपल्याला कोणत्याही कारणाने एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे अशी शंका मनात असल्यास लगेच निदान करून घ्या. एक लक्षात घ्या वेळेवर निदान झालं आणि उपचार सुरू झाले तर एचआयव्ही झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. जर काही काळजी घेतली आणि आपल्या जीवनशैलीत बदल केले तर एचआयव्ही असतानाही चांगलं आयुष्य जगण्याच्या शक्यता वाढवता येतात. निरोगी जीवनशैली, वेळेवर आरोग्य तपासणी, पोषक आहार आणि सकारात्मक मानसिकता यामुळे एचआयव्हीसह जीवन चांगलं जगता येऊ शकतं.

93 Responses

  1. Prakash Marathe says:

    HIV झालेल्या व्यक्तीच्या तोंडामधील लाळेमध्ये HIV चे जन्तु असतात का ?

  2. deepak says:

    Partner ko aur mere ko hiv nahi hai uske sath bar bar sex karne se hiv ho sakta hai

    • deepak says:

      Mere 2 grail Friend hai une hiv nahi aur muje hiv nahi hai to hiv hone khatra hai kya

      • Rahul says:

        HIV 4TH GENERATION(metropolis labs) duo test by CMIA day 62 DAY (0.15),DAY 88(0.13) Ani by ECLIA day 118(0.2) ALL NON REACTIVE ASTIL but symptoms like gilayla trass hone ,hyper acid reflux asel tr results conclusive astil ka parat test karavi lagel ka karan windows nanantr test kelya ahet or parat 6 month la retest karaychi garaj ahe Kay ? Karah kahi guidelines different window period dakhavtat

        • let's talk sexuality says:

          एचआयव्ही साठी विंडो पिरीयड हा सहा ते बारा आठवडे असा असतो. तुमची ११८ दिवसांनंतरची टेस्ट नॉन रिआकटीव्ह असेल तर काळजीचे कारण नाही. पुन्हा सहा महिन्यांनंतर टेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला होत असलेला त्रास आसिडिटी मुळे होऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  3. shobha gawali says:

    Agar beena condon ke sambandh 3 /4 logo ke sath rakhne se ho sakta hai kya.

  4. समीर चाहल says:

    सर, मै और मेरा दोस्त एक लडकी के साथ बार बार सेक्स करते है।मेरा दोस्त हप्ते मे 2 ते 3 बार करता है लेकींन मै हर दिन मै 2 ते 3 बार करता हू। पहले ओ बार बार सेक्स करता था जैसे मे अब करता हू ।मै सेक्स करते समय उसकी योनी अपने मूह से चाटता हू ,किस भी करता हू।कभी कभी मै उसके योनी से अनेवाला स्त्राव भी पी लेता हू वैसे ही वो लडकी भी मेरा लिंग अपने मूह मे लेती है और कहि बार उसने मेरा वीर्य भी पिया है। हम में से किसींको एड्स नही है। तो क्या मुझे और मेरे partener को और हम तिन को एड्स हो सकता है क्या।plz मुझे ans जलदी भेजो

  5. Ajay kadam says:

    एड्स असलेल्या व्यक्ती ला किस केल्याने आपल्याला एड्स होतो का?

  6. दत्ता says:

    सभोगा नंतर 1आठवडयात एचआईवीची लक्षणे जाणवतात का? जसे की जुलाब?

  7. Sonu says:

    Sir hiv teast 15 महीने me 5 बार करवाया nigitve hay oar चेक करना चाहिए kay plz batavo मायने aek accident के पेशंट को उठाया था so plz ans दीजिए mam

  8. mayur dhumal says:

    1.)सर एच आय व्ही व्यक्ती सोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच आय व्ही होऊ शकतो का.?

    2)वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग करणे सुरक्षित आहे का?

  9. Pratik says:

    Hiv किंवा एड्सअसलेल्या महिलेसोबत कंडोम वापरून सभोग केल्यावर एड्स किंवा इन्फेकॅशन होण्याची शक्यता किती असते?
    कंडोम वापरल्याने किती प्रमाणात सुरक्षा मिळते?पहिल्यांदाच सेक्स केल्यावर hiv होण्याची किती शक्यता असते?सेक्स करताना एकावेळी किती कंडोमम वापरावीत?

  10. aniket says:

    bf sobat pn sex zalay n dusra bf pn aahe jr sex krtana tyachi sperm an thod blood aat gelyas hiv hoto ka
    2 sobat bina com sex zalay

  11. Pmd says:

    पिक्चरटाँकीज मध्ये टाचनी टोचविल्याने एडस झाला अशी बातमी खरी असु शकते का ?

  12. Prathamesh says:

    एच आय व्ही बाधीत स्रीचे ब्रेस्ट चोखल्याने लागण होते का ?

  13. Kachru says:

    Maz lagn houn 2 varsh zaliy, maza job gadivar firnuacha ahe mazya penis la infection zal, pandhrya pural alya mazyamul tichya yonila pan reaction zalay hiv che lakshan ahe ka?

  14. Anant says:

    असुरक्षित संभोगानंतर कमीत कमी किती दिवसात HIV ची लक्षणे दिसतात?

  15. Sanket says:

    Agar age 15 saall ho tab anal sex kiya hai
    7saal ho gaaye aur partner HIV +be tha to HIV hota hai kya ,but mera penis uske anal me nhi gaya that surf bahar lagaya tha to HIV ho sakta hai kya

  16. pd says:

    maza GF Cha parents na aids hota but ticha janmacha 10 varshananter te warle mg Tila HIV asu shkto ka…
    mi tichabrobr without condom sex kela ahe but mala tas khi symptoms janvle nhit…

  17. Vidya Khude says:

    एचआयव्ही झालेल्य माणसाचे वीर्य महिलेच्या योनी मध्ये गेले नसे नसेल पण सेक्स केला असेल तर त्या महिलेला एचआयव्ही होऊ शकतो का

  18. Kishor hingde says:

    सर हातावर गोंधले आणि एका महिन्या नंतर थोड बाजूला एका जागी सूज आली आणि आता 15 दिवस झाले आजुन ही ती सूज आहे तर काय समजावे थोड सांगा सर या बद्दल

  19. AJit gawade says:

    Sir maze boys to boys sex zale 4-5 Janansobat so bat mla hiv houshkto ka..typaiki konalach nasta tri

  20. AJIT Gawade says:

    Pan sir ya gostila 3 yer zale ani…ani ya 3 varshat mi 5 test kelya non reactive Ali. .tr bhavishyat positive hou shakte ka..

  21. kn says:

    सर माझं एका पेक्षा अधिक विवाहित महिलांशी संबंध विना कंडोमचा झालाय , आणि या प्रत्येक संबंधमध्ये 4 ते 5 दिवसांचा ग्याप आहे , तर HIV होण्याचे कारण आहे का ?

  22. Rushikesh karale says:

    H.i.v जर एका व्यक्तीला आहे आणी समोरच्या व्यक्तिला नाहि आनि त्याचे संबध आले तर h.i.v होऊ शकतो का?

  23. s says:

    I due to prone type masterbation hiv cause. I’m doing it from 2010 does it leads hiv

  24. abhishek bhaisare says:

    Hiv positive aslelya vyakti ch blood juice mdhe mix krun dilya gel age mla
    Tr mla aids honar ka

  25. Attu Patil says:

    जर मी एका व्यक्ती सोबत मुखमैथुन केल व नंतर 2-3 दिवसांनी एका वेश्या व्यवसाय करणार्या महिला सोबत संभोग करत असताना जर निरोध अचानक फाटला तर मला HIV/AIDS होऊ शकतो का..??
    ( वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही व्यक्ती ना HIV नाहीये )
    सांगा सर मी खुप घाबरलो आहे

  26. Jbl says:

    Aids aslelya stree la period yete ka

  27. महेश says:

    सर जर 10 महिन्यापूर्वी असुरक्षित संभोग केला असेल आणि त्यानंतर मलेरिया किंवा डेंग्यू आजार झाले आणि ते बरे पण झालेत.वजनामध्ये वाढ झाली आहे ही लक्षणे एड्स ची आहेत का

  28. चेतन पाटील says:

    मि बाहेर वेश्यासोबत सेक्स केल. पण मि जसे सेक्स करायला लागलो तर लगेच 1 मिनिटात कोन्डम फाटले.मग त्या बाईने लगेच दुसरे दोन कंडोम चढवले मग आम्ही सेक्स केल.तर मला भिती होती की यामुळे मला एच आय व्ही होईल का? मला मार्गदर्शन करा . तसा. कोणताही स्राव तिच्या. योनितुन झाला नव्हता.व ति बोलताना बोली. कि पैसे आयुष्य भर कमवता.येतील.पण जिवन एकदाच मिळतो.त्या मुळे तुम्हालाही रोग नाही ..आणी मला पण रोग नाही.मि घाबरुण हा व्यवसाय करते.पण तरीही मला भिती वाटत होती.

  29. Aniket says:

    Sir meri gf ki ma ki HIV se death Hui hai gf ki age abhi 23 hai…. Mera usase only 7 month ki relationship thi…….. Maine blood tests Kiya hai Voh negative usaki tabbet bi thik thak hai aur uske bhai ki thik thak Ghai…Lekin man ghabrata hai

    Pahla sex December Mai hua tha us ke bad har 15 day kbi kbi without condom …… Toh for kya kare Maine kal hi taste ki hai…….. Karibi logose pata chlata hai ki unhe Abhi is 8 sal Mai yah huva hai yah pata chala tha …..use 23 years Mai koi Aisa prb nahi hua ……usaki body weight to bad Rahi hai bhai ki bhi tabiyet achi hai body vagere 7 month Mai 3 month pahle ka bhi sex majud hai to kya kareee

  30. Sachin says:

    सर माझे काही दिवसांपूर्वी. एका पुरूषाबरोबर अनैसर्गिक संबंध 3वेळा झाला होता.. नंतर समजले की त्या व्यक्तीला एड्स आहे. मी संबंध झाल्यानंतर6–7महिन्यानी. रक्त तपासले रिपोर्ट निगेटिव्ह आहेत..तरी परत तपासणी करावी लागेल का????

  31. Anil says:

    Sir eka callgirl shi kapde n kadta ,varun vina kandom sex kela ani sperm tecycha var padle tr hiv hoto ka

  32. Kalidas A Shendre says:

    1) एखाद्या अविवाहित पुरुषाने 100 अविवाहित स्त्रियांसोबत शारीरिक संबंध ठेवले परंतु त्या 100 अविवाहित स्त्रियांनी माझ्याशिवाय अन्य कोणत्याही पुरुषांसोबत शारीरिक संबंध नाही ठेवले तर त्या अविवाहित पुरुषाला किंवा त्या 100 अविवाहित स्त्रियांना एच आय व्ही ची बाधा / लागण होऊ शकते का?

    2) एखाद्या अविवाहित स्त्रीने 100 अविवाहित पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले परंतु त्या 100 अविवाहित पुरुषांनी त्या अविवाहित स्त्रीशिवाय अन्य कोणत्याही पुरुषांसोबत शारीरिक संबंध नाही ठेवले तर त्या अविवाहित स्त्रीला किंवा त्या 100 अविवाहित पुरुषांना एच आय व्ही ची बाधा / लागण होऊ शकते का?

    वरील दोन्हीही प्रश्नार्थक स्वरूपाच्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट अशी आहे की, उदाहरण क्रमांक 1) मध्ये 1 अविवाहित पुरुष आणि 100 अविवाहित स्त्रिया यांच्यात एकनिष्ठता आहे म्हणजेच एकूण 101 जणांमध्ये 102 नंबरचा कोणीताही पुरुष अथवा स्त्री शारीरिक संबंधाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत नाही. याउलट, उदाहरण क्रमांक 2) मध्ये 1 अविवाहित स्त्री आणि 100 अविवाहित पुरुष यांच्यात एकनिष्ठता आहे म्हणजेच एकूण 101 जणांमध्ये 102 नंबरचा कोणीतीही स्त्री अथवा पुरुष शारीरिक संबंधाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत नाही.

    कृपया, सर्व सन्माननीय तज्ज्ञ संशोधक, विचारवंत, अभ्यासक यांना मी विनम्रपणे उक्त दोन प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आवाहन व विनंती करतो. कारण, मी आजतागायत वरील दोन्हीही प्रश्न अनेक समुपदेशकांना विचारलेली आहेत. मला त्यांच्याकडून म्हणजेच प्रत्येक समुपदेशकांकडून पुढीलप्रमाणे उत्तर मिळालेले आहे आणि ते म्हणजे, “लैंगिक शारीरिक संबंधामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यात एकनिष्ठता असली पाहिजे. विवाहपूर्व व विवाहबाह्य असुरक्षित व अनैतिक स्वरूपाचे लैंगिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे एच आय व्ही ची बाधा / लागण होते. परंतु, या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की, भारतातील सर्वच लोक (काही लोकांचा अपवाद वगळता) अशा प्रकारच्या समजण्यास कठीण असलेल्या शब्दांचा (उदा. एकनिष्ठता व अनैतिक) अर्थ व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. त्यामुळे, वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य माणसाला कळतील अशा प्रकारे शब्दशः अर्थाच्या स्वरूपामध्ये उत्तरे मिळाल्यास निश्चितच भारतात एच आय व्ही चे प्रमाण सर्वात कमी होईल व कालांतराने त्याचे पूर्णतः निर्मूलन होईल, असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद!

  33. राहुल says:

    सर माझे वेश्याबरोबर संबंध आले त्या दरम्यान निरोधचा वापर केला होता परंतु निरोध काढताना योनीचा स्राव माझ्या बोटाना लागला व नंतर लिंगाची कातडी पीठामागे करताना त्या बोटानंचा स्पर्श लिंगाला झाला अाणि त्या वेश्याचे स्तंन मी तोंडात घेतले त्या दरम्यान मला खोखला होता तर HIV विषाणुं माझ्या तोंडा द्ववारे जाऊन HIV होऊ शकतो का कारण मला त्या दरम्यान खोखला होता आणि मी सर्व घटना घडल्यानंतर २४ दिवशी मी RNA PCR ही टेस्ट केली ती निगेटिव आली तर मी Safe आहे का

  34. Vinayak says:

    मी एका महिला सोबत संभोग केला निरोध चा वापर पण केला होता पण तिचा स्तन मधून दृध माझ्या पोटात गेलं तर मला hiv होऊ शकतो का आणि निरोध सुद्धा फाटलं होत पण मी लगेच बद्दल plz help mi plz

  35. Mahesh says:

    Sir me ek veshya sobat sabhong thevala hota 2 condom use kela sabnhong zhalya nantar mi condom fatala aahe ka nahi chek karnyasathi haath lavala aani to haath mazhya lingaala sparsh zhala …….sir hiv virus lingaat entry karu shakatat ka

  36. Samrat says:

    Sir mazhya aangavar lal rangachya resha yetat shariravar kuthehi yetat kahi velani te barya hotat satharan sandhyakali dok dukhat aani potat gass hoto hiv test negative dakhavali mala hiv zhala asel ka sir

  37. Guru says:

    लग्न झालेल्या महिला सोबत५ते६ वेळेस न कंडोम वापरता शारीरिक संबंध झाले असेल तर hiv होऊ शकतो का ,

  38. बाळासाहेब काळे says:

    एक विधवा स्त्री जिचा पती आठ वर्षांपुर्वी एड्स ने मृत्यू झाला तर या स्री ने कुठल्याही प्रकारची एच आय व्ही तपासणी केली नाही . तीला आतापर्यंत कोणत्याही लक्षणे नाहीत तर तीला एच आय व्ही असु शकतो का

  39. Nilesh says:

    Jar 3 manhinyanni report positive Kinva negetive samjat asel. Pan tya 3 mahinya agodar jar ti sri positive asel tya strishi asurkshit sambhog kela tar HIV hovu shakato ka. Aani samja jar hiv test 3 mahinya agodar tapasalyane negative ali mhanun asurkshit sambhog karu shakato ka. e.g. aaj test report negetive aala aahe tar aaj asurkshit pane karu shakto ka. Bhavishyat tyacha dhoka rahil ka.

  40. Ganesh says:

    Sir mazi pani hiv positive Aahe aani mi tichya sobat bina condam ne sambhog pan kela tehi purn 20 divas tar mala hiv honar kay AATA 6 mahine zale mi raktachi tapasani 2 da keli report normal Aahe tar mala hiv hoyil ka

  41. SHWETA says:

    HI SIR JR 4 LOANSOBAT SAMNDH THEVLA ANI TYA 4 HI LOKANA HIV NASEL TR MLA HOU SHAKTO KA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap