प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भपात कसा करावा

चुकुन दिवस गेले आहेत।
घरी सांगू शकत नाही आणि डॉ.कड़े पण जाने धोक्याचे आहे।

please need your help

1 उत्तर

सगळ्यात आधी, घाबरू नकोस. असं कधी तरी होऊ शकतं.
दिवस गेलेत म्हणजे पाळी चुकली आहे का?  किती महिने झाले आहेत? प्रेग्नन्सी टेस्ट केली आहेस का? टेस्ट केली असशील आणि त्यातून कळत असेल दिवस गेले आहेत तरच गर्भपात करण्याची गरज आहे. पाळी कधी कधी उशीरा येऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी प्रेग्नन्सी टेस्ट करून घे.
गर्भपात करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मदतीशिवाय गर्भपात करणं जिवासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा, त्यासाठी काही उपाय करण्याचा विचारही करू नकोस. अशा कोणत्याही उपायांनी गर्भपात होत नाही. उलट शरीराला आणि गर्भाशयाला गंभीर इजा होऊ शकते.
तू 18 वर्षांहून मोठी असलीस तर स्वतःच्या जबाबदारीवर, आई-वडलांच्या संमतीशिवाय तुला गर्भपात करून घेता येईल. कोणी तरी मोठी (सज्ञान) व्यक्ती सोबत असणं गरजेचं आहे. ज्याच्यासोबत दिवस गेले आहेत, त्याची मदत होऊ शकेल. किंवा तुझ्या विश्वासातली एखादी मोठी मैत्रीण किंवा नातेवाईक आहे का ते पहा.
जर एकच महिना पाळी चुकली असेल तर गर्भपात करणं सुरक्षित आहे. जितक्या जास्त लवकर गर्भपात करता येईल तितका चांगला. जास्त दिवस गेले तर त्यानंतर त्यातली गुंतागुंत वाढू शकते. पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात गर्भपात करणं जास्त जिकिरीचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीनेच हा निर्णय घेणं श्रेयस्कर आहे.
तू कुठे राहतेस (कोणत्या गावात, शहरात) ते कळवलंस तर तिथल्या काही डॉक्टरांचे किंवा सुरक्षित दवाखान्यांचे नंबर तुला पाठवता येतील. पुढे एक पत्ता दिला आहे, तिथे फोन करून चौकशी करून घे. ही संस्था सुरक्षित गर्भपाताची सेवा देते आणि तिथे तुझी ओळख उघड होणार नाही. त्यामुळे न संकोचता फोनवर चौकशी कर. खरं तेच सांग. तुझं वय, किती दिवस झाले आहेत या गोष्टी खऱ्या सांग. तू पुण्यात राहत असलीस, तर तुला या ठिकाणी गर्भपाताची सेवा मिळू शकेल. नाही तर तुझ्या भागामध्ये कुठे अशी सेवा मिळेल त्याची माहिती तुला इथे मिळेल.

Family Planning Association of India,
Pune Branch, 101,
Western Court, 1082/1,
Ganeshkhind Road, Opposite E-Square Cinema,
Shivajinagar, Pune 411 016
Tel. No. : 020-65601453 to 65601457
डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा विचारही करू नकोस. आणि टेन्शन घेऊ नकोस. गरज पडल्यास तथापिमध्ये फोन कर.

swapnil replied 7 years ago

टेबलेट काय आहेत

viraj replied 6 years ago

3 महिने पाली आली नसेल तर काय करावे

I सोच replied 6 years ago

अनियमित पाळी येण्याविषयी अनेक प्रश्न आपल्या वेबसाईट वर चर्चिले आहेत ते नाकी वाचा.
आधीचे प्रश्न आणि उत्तरे https://letstalksexuality.com/question/
तसेच ‘आपली शरीरे’ या सेक्शनमध्ये अनेक लेखही दिले आहेत. ते वाचा.
माझी पाळी इतकी उशिरा का येते? यावर आधारित एका लेखाची लिंक देत आहे
https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

I सोच replied 6 years ago

प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.
कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 4 =