प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भ तयार होण्यासाठी काय करावे?
1 उत्तर

आजच्या विज्ञान युगात गर्भधारणा होण्यासाठी दोन पध्दती उपलब्ध आहेत. पहिली म्हणजे पारंपारिक संभोग आणि दुसरी म्हणजे विनासंभोग करता टेस्ट ट्युबबेबीची पध्दत..! टेस्ट ट्युबबेबीच्या पध्दतीसाठी तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

गर्भधारणा होण्यासाठी महत्वाचं असतं स्त्रीबीजाचं आणि पुरुषबीजाचं मिलन होणं. स्त्रीबीज पाळी येण्याच्या 12 ते 16 दिवस आगोदर बीजनलिकेत येतं. जर याच काळात संभोग होऊन पुरुषबीज बीजनलिकेपर्यंत पोचलं की गर्भधारणा होण्याची शक्यता बनते. प्रत्येक स्त्रीला साधारणपणे आपल्या मासिक पाळी चक्राचा अंदाज असतो. म्हणजे किती तारखेला मासिक पाळी येईल याचा साधारण अंदाज काही स्त्रीया बांधू शकतात. मासिक पाळी येण्यापूर्वी 12 ते 16 दिवस आगोदरचा काळ हा गर्भधारणेसाठी योग्य असतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 15 =