संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पाडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
गर्भ निरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.