प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर पुरूषाने नसबंदी केली तर त्याचे दुष्परिणाम होतात का? उदा. 1. लैंगिक भावना बंद होणे 2. सेक्स ची इच्छा न होणे

1 उत्तर

नसबंदी केल्यावर लैंगिक भावना बंद नाही होत. तुम्हाला नसबंदी म्हणजे नक्की काय करतात हे माहित आहे का? चला समजुन घेऊयात.

पुरुषांच्या वृषणांमध्ये पुरूषबीज निर्मिती होते तर ती बीजं नंतर वीर्यग्रंथी मध्ये असलेल्या विर्यात मिसळून बाहेर पडत असतात. पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रियेत वृषणावर छोटा छेद देतात आणि बीजनलिका मध्येच कापून त्यांची तोंडं बंद करतात. यामुळे बीजं वीर्यामध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे संबंधांच्या वेळी पुरुषबीज नसलेले वीर्यच फक्त बाहेर येते आणि गर्भधारणा टळते.

म्हणजेच काय तर फक्त बिजांचा मार्ग रोखला जातो. बिजाची निर्मितीही पहिल्यासारखीच चालू असते फक्त त्यांचा बाहेर पडायचा मार्ग बंद असतो. ते तयार होतात अन तिथेच नष्ट होतात. बाकी सगळं पहिल्यासारखंच असतं.

तसेच लैंगिक संबंध करायची इच्छा पण कमी नाही होत. फक्त सुरवातीला काही काळजी घ्यावी लागते. जसे की, नसबंदी झाल्यानंतर पुढचे किमान तीन महीने किंवा 20 लैंगिक संबंधांपर्यंत निरोध वापरावा लागतो. कारण काही बीजं आधीच वीर्याकोशात गेली असतील तर त्यापासूनही गर्भधारणा होऊ शकते. परत मूल हवे असल्यास कापून अलग केलेल्या विर्यवाहक नलिका शस्त्रक्रियेने परत जोडता येतात, परंतू ही शस्त्रक्रिया 50% च यशस्वी होण्याची शक्यता असते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/vascotomy/

https://letstalksexuality.com/nasabandi-kelayas-vhay/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 12 =