प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर स्त्री च्या गुद्वारा मध्ये लिंगाला कंडोम न लावता संभोग sex केला.. तर एड्स होतो का? .. जर नाही होत तर अस का ? अणि जर समजा ती स्त्री एड्स बाधित आहे जर मी तिच्या सोबत सम्भोग हा लिंगाला कंडोम न लावता केला तर गुद्द्वारात लिंग घालून केला तर मला एड्स होइल का???
1 उत्तर

एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला शरीरातील स्रावांमधून होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

दूषित रक्त आणि

प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करुन लेख वाचा:

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 20 =