प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदररोज सेक्स केल्याने विर्य कमी प्रमाणात बाहेर येते तर अशावेळी गर्भधारणा होते कि नाही ?

1 उत्तर

दररोज सेक्स केल्याने वीर्य कमी प्रमाणात बाहेर येते हाच एक गैरसमज आहे. प्रथम त्याविषयी बोलूयात. पुरुषांच्या वीर्यकोषांमध्ये सतत वीर्याची निर्मिती होत असते. वाढत्या वयात, किंवा नंतर देखील पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन्स पाझरू लागल्यानंतर जेव्हा मनात लैंगिक भावना जागृत होतात तेव्हा सेक्स केल्यानंतर किंवा हस्तमैथुन केल्यानंतर लिंगातून वीर्य बाहेर पडते.  झोपेत जेव्हा लैंगिक क्रियांबद्दल स्वप्नं पडतात तेव्हा नकळत लिंगातून वीर्य बाहेर येते. कधी कधी जास्तीचं वीर्य झोपेत किंवा जागृत अवस्थेत देखील नकळत बाहेर येते. ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुळात सेक्स केल्याने किंवा नकळत वीर्य बाहेर पडल्याने  झाल्याने शारीरिक ताकद कमी होते किंवा वीर्य कमी प्रमाणात बाहेर येते हा विचार चुकीचा आहे त्यामुळे असा विचार करणे सोडून द्या व सेक्सचा आनंद घ्या.
आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. गर्भधारणा होण्यासाठी एक शुक्राणू देखील पुरेसा असतो. शिवाय शुक्राणूना त्यांची स्वतःची गती असते. त्यामुळे एखादेवेळी समजा वीर्य कमी प्रमाणात आले तरीही गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे आवश्यक आहे. गर्भ निरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 15 =