माझ आणि माझ्या मैत्रीणीच वय २२ आहे आणि आम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा भेटतो… एका महिन्यापूर्वी पर्यंत आम्ही भेटायचो तेव्हा मी चार वेळा वीर्यपतन करू शकाय्चो… पण ह्या महिन्यात मात्र मला दुसऱ्या वेळी पण वीर्यपतन जमल नाही… नंतर नंतर दहा पंधरा मिनिटे sex करून मग लींगात ताठरता राहिली नाही आणि तीपण थकल्यामुळे थांबाव लागल… मी डॉक्टरकडे जाव का कि हे नॉर्मल आहे ते सांगा

1 उत्तर

मित्रा, घाबरून जावू नकोस, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. एकदा, दोनदा, तीनदा किंवा चारदा याला फार महत्त्व नाही तर त्यातून तुला आणि तुझ्या मैत्रिणीला आनंद मिळतो का हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाला ताठरता येत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आणि जास्त वेळा संभोग केला म्हणजे जास्त आनंद असं काही नसतं बरं का!

बऱ्याचवेळा पुरुषांवर पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून सेक्सच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

लैंगिक क्रियांमध्ये स्कोर महत्वाचा नसून आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला मिळणारा आनंद महत्वाचा आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील ‘ सेक्स बोले तो ‘ हा सेक्शन वाच. सेक्सविषयी सर्व शास्त्रीय माहिती मिळेल. याचबरोबर लिंग ताठरता, लैगिक सुखास मारक आणि लैंगिक सुखास पूरक अशा दोन लेख वेबसाईटवर आहेत. त्याच्या लिंक देत आहोत त्याही आवर्जून वाचा.

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/9907-2/

https://letstalksexuality.com/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-penis-erection/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 16 =