प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी मध्ये sex केल्यास काय होते? दिवस जातात का

1 उत्तर

मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी असते पण नाकारता येत नाही. ज्यांचे पाळीचक्र अनियमित असते, लहान आहे अशावेळी गर्भधारणा होऊ शकते. शिवाय या काळात योनीमार्गातून रक्तस्राव होत असल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे आवर्जून कंडोमचा वापर करावा.

मासिक पाळीमध्ये सेक्स करावा की नाही हा सर्वस्वी त्या स्त्रीचा निर्णय असायला हवा. काहीवेळा काही स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात काही त्रास होत असतो. असं त्रास होत असेल तर संबंध टाळावा. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही.

अधिक माहितीसाठी मासिक पाळीतील लैंगिक संबंध हा लेख देत आहोत.

https://letstalksexuality.com/sex_during_periods/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 0 =