प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे वय 34 आहे माझे लिंग खुपच लहान आहे व शिघ्रपतन होते तर लिंग वाढी साठी वाटते शिघ्रपतन साठी उपाय सांगा
1 उत्तर

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तिप्रमाणे आपण सर्वजण वेगवेगळे आहोत. कुणाची उंची कमी तर कुणाची जास्त. कोण जास्त बोलतो कोणी कमी बोलतो. हे बदल जसे नैसर्गिक आहेत तसं लिंगाचा आकार देखील कमी-जास्त असतो. या आकारामुळं लैंगिक सुखामध्ये कोणताही अडथळा येत नाही. लिंगाचा आकार अगदीच लहान म्हणजे योनीमध्ये जात नसेल तर गर्भधारणेस अडचण येवू शकते. त्यामुळं लिंग बारीक आहे याचा न्यूनगंड घेवून जगण्यापेक्षा जोडीदारासोबत किंवा हस्तमैथुनानं लैंगिक आनंदाकडं लक्ष द्यावं. दुसरा प्रश्नही पहिल्याप्रश्नासारखाच आहे. प्रत्येकाचा वीर्यपतनाचा(वीर्य बाहेर येण्याचा) कालावधी वेगवेगळा असू शकतो. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला त्याची मदत मदत घेवून यावर तोडगा करता येईल. तरीही तुम्हाला असं वाटत असेल की संभोग करताना खूपच कमी कालावधीमध्ये वीर्यपतन होत आहे तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 10 =