प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझ्या बायकोला दिवस जाऊन 3 महिने पुर्ण झालेत पण आम्हाला खाली करायचे आहे

1 उत्तर

भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यास तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो.

गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/abortion/

गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर या 9075 764 763 हेल्पलाईनवर फोन करा.

मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 2 =