प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझ वय 19 आहे मला सारखी सेक्स हस्तमैथून व सेक्स करण्याची इच्छा होते

माझ वय 19 आहे मला सारखी पॉर्न फ्लिम्स पाहने , हस्तमैथून करावसे वाटते सेक्स हि करावसे

वाटते पन मी थोडा धार्मीक असल्या मुळे मला सेक्स विषयी हस्तमैथूना विषयी नाकारात्मक भाव निर्माण होत आहे तरही मी हस्त मैथून आठवड्यातून 4 ते 5 वेळा करतो पन मला यात सकारात्मक व नकारात्मक गुंता गुतीचा विषय निर्मान झाला आहे त्यामुळे मला मानसीक त्रास होतो तो थांबविण्या साठी  यातून मला साकारात्मक विषया कडे वळायचे आहे योग्य मार्गदर्शन करा

1 उत्तर

त्यात काही वावगं नाही. तुम्ही वयात आला आहात. या वयात जोडीदार हवा वाटणं, आकर्षण वाटणं, हस्त मैथूनातून आनंद मिळवणं, सेक्स करावासा वाटण काही गैर नाही. स्वाभाविक आहे. हस्त मैथुन एक सामान्य क्रिया आहे जिथे तुम्ही स्वतःला आनंद मिळवून देता. सहसा त्यात दुसऱ्या कोणाची गरज नसते.

सेक्साठी तुम्ही एका अर्थाने तयारही आहात. सज्ञान आहात. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम आहात. पण लक्षात ठेवा असा निर्णय घेताना काही गोष्टींचे भान असेल तर तो एक आनंददायी अनुभव ठरतो अन्यथा त्यातून निराशा नाहीतर अपराध भाव निर्माण होण्याची शक्यता असते. जोडीदाराप्रती विश्वास, आदर, संमती, खाजगीपणा आणि सुरक्षीतता ह्या गोष्टींची खबरदारी घेऊन केलेले संबंध अधिक उत्तम ठरतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/question/what-is-sex/

https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 7 =