प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिकपाळी चुकली आहे

माझे मासिक पाळी 4 मे ला होती मी 11 मे का असुरक्षित सेक्स केला 5 तासांनी unwanted 72 घेतली नंतर 16 तारखेला रक्तस्राव झाला होता पण आता माझी मासिक पाळी ची तारीख उलटून गेली आहे.तर प्रेग्नेंट राहण्याचे काही चान्स आहे का.आणि माझी मासिक पाळी लेट होण्याचे कारण काय असावे.

1 उत्तर

जर तुम्ही unwanted 72 पाच तासाच्या आत घेतली आहे तर गर्भधारणेची शक्यता नाही.

गोळ्या घेतलेल्या महिन्यात मासिक पाळी पुढे मागे होण्याचे प्रमाण अधिक असते. जर पाळीची तारीख दोन आठवड्याहून अधिक काळ पुढे गेली तर प्रेग्नन्सीची तपासणी करून घ्यायला हवी.

झाल्या प्रकारामुळे टेन्शन आलं असेल, मानसिक ताण असेल तर त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळी उशीरा येते.

अंडोत्सर्जन बाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/conception/

unwanted 72 सारख्या गोळ्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.

https://letstalksexuality.com/ecp/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 10 =