मासिक पाळीच्या २ दिवस आगोदर संभोग(सेक्स) केल्यामुळं गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. म्हणजेच मासिक पाळी येण्याच्या आगोदर १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी महत्वाचे असतात. त्यामुळं तुम्हाला पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.