प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळीबद्दल

माझ्या पत्नीला लग्नाआधी मासिक पाळी ४२ दिवसांनी एकदा येत असे, परंतु एक अपत्य झाल्यानंतर मासिक पाळी वेळेवर येत नाही, खूप उपाय केलेत परंतु पाळी वेळेवर येत नाही कृपया मार्गदर्शन करावे

1 उत्तर

बाळ जन्मल्यानंतर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं. पण पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये बाळ झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येते तर काही जणींना दोन वर्षं पाळीच येत नाही. याचा संबंध बाळ अंगावर दूध पितं त्याच्याशी आहे. बाळ जर पूर्णपणे अंगावर दूध पीत असेल तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक तयार होतं ज्यामुळे पाळी चक्रासाठी आणि अंडोत्सर्जन होण्यासाठी आवश्यक इतर संप्रेरकं तयार होत नाहीत. बाळ जर दर दोन तासांनी अंगावर दूध पीत असेल तर मेंदूला निरोप मिळतो की अजून बाळ अंगावर पितंय त्यामुळे इतक्यात पुढच्या गर्भाची तयारी नको! जसजसं बाळ अंगावर कमी प्यायला लागेल तसं जनन चक्र हळू हळू पूर्वपदावर येतं आणि अंडोत्सर्जन होऊन पाळी येते. पाळी येते त्या आधी 12-16 दिवस अंडोत्सर्जन झालेलं असतं.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/lactation-and-menstruation/

आपल्या पाळीचक्राविषयी जागरूक असणं कधीही चांगलं त्यामुळे अपत्य होऊन खूप वर्षं झाली असतील आणि तरीही पाळी येत नसेल तर कृपया स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणंचं योग्य ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 16 =