बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?

8 15,561

गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं. कारण जे रक्त पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. मग खरं तर बाळ जन्मल्यावर परत पाळी सुरू व्हायला पाहिजे. पण असं लगेच होत नाही. का ते समजून घेऊ या.

आपलं शरीर म्हणजे एक अतिशय जटिल यंत्रणा आहे. शरीरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा काम करत असते. तिचं नाव आहे – बायो फीडबॅक. म्हणजे काय तर शरीराला कोणत्या घटकाची, संप्रेरकाची गरज आहे ते मेंदूपर्यंत पोचवण्याची चोख व्यवस्था आपल्या शरीरात असते. मासिक पाळी आणि जननाच्या चक्रामध्ये ही बायो फीडबॅक यंत्रणा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.

बाळ जन्मल्यानंतर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं. पण पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये बाळ झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येते तर काही जणींना दोन वर्षं पाळीच येत नाही. याचा संबंध बाळ अंगावर दूध पितं त्याच्याशी आहे. बाळ जर पूर्णपणे अंगावर दूध पीत असेल तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक तयार होतं ज्यामुळे पाळी चक्रासाठी आणि अंडोत्सर्जन होण्यासाठी आवश्यक इतर संप्रेरकं तयार होत नाहीत. बाळ जर दर दोन तासांनी अंगावर दूध पीत असेल तर मेंदूला निरोप मिळतो की अजून बाळ अंगावर पितंय त्यामुळे इतक्यात पुढच्या गर्भाची तयारी नको! जसजसं बाळ अंगावर कमी प्यायला लागेल तसं जनन चक्र हळू हळू पूर्वपदावर येतं आणि अंडोत्सर्जन होऊन पाळी येते. पाळी येते त्या आधी 12-16 दिवस अंडोत्सर्जन झालेलं असतं.

पुढचं बाळ लगेच नको असेल तर बाळंतपणानंतर पहिली पाळी येईपर्यंत पुरुष जोडीदाराने निरोधचा वापर करायला हवा कारण अंडोत्सर्जन झालेलं कळलंच नाही आणि नेमके त्याच काळात संबंध आले तर अशी पाळी येण्याच्या आधीच परत दिवस जाऊ शकतात. याला मराठीत ‘मिंधं राहिलं’ असं म्हणतात. ते टाळण्यासाठी पाळी येईपर्यंत निरोध वापरावा किंवा संभोग न करता इतर प्रकारे एकमेकांना शरीरसुख देता येईल.

8 Comments
 1. Gopi says

  Khup Mahtavachi mahiti sangitali…..Yaa Website che founder kon ahet ??

  1. I सोच says

   तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आभारी आहोत. ही वेबसाईट तथापि ट्रस्टने सुरु केली आहे. अधिक माहितीसाठी http://www.tathapi.org ही वेबसाईट पाहा.

 2. Vidya Sutar says

  Prasuti nantar 2 mahinya madhe 3vela maasik pali aley tar hey bare Ka nahii? Plz reply

  1. I सोच says

   आम्हाला आपला वैद्यकिय इतिहास माहित नसल्या कारणाने नक्की उत्तर देण्यास आम्ही असमर्थ आहोत. 2 महिन्यात 3 वेळा पाळी येण्यामागे काही संसर्ग आहे कि नाही याबाबत पाहुनच कळेल. त्यामुळे आपण एखाद्या स्त्री रोगतज्ञांंना भेटा व त्यांचा सल्ला घ्या

 3. megha more says

  prasuti nantar 1 varshani pali aali aani parat savva mahini pali aali pan raktstrav kahich 1 hi divas zala nahi. pls upay suggest kara

  1. let's talk sexuality says

   उपाय हाच आहे की, तुम्ही डॉक्टरांना दाखवा कारण तपासणी केल्याशिवाय नक्की काय कारण आहे हे कळणार नाही.
   तेव्हा तपासणी करा, डॉक्टरांना भेटा!

 4. गौरी says

  खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली.. खूप खूप आभार

  1. let's talk sexuality says

   धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.