प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी 24 वर्षांचा आहे. लिंगाला ताठरता येते पण प्रयत्न करुन ही योनी प्रवेश होत नाही. मला संभोग करता येत नाही. मला हस्तमैथुन करावे लागते. लग्न म्हटलं की भीती वाटते, बायको माझ्या सोबत राहील की नाही याची, तुमचा सल्ला माझं आयुष्य बदलू शकतो.. मी काय करू???

1 उत्तर

मित्रा,
कुठलीही गोष्ट आपल्याला शिकावी लागते, लैंगिक क्रिया ही सुद्धा शिकण्याचीच बाब आहे. सुरुवातीला नाही जमलं म्हणजे भविष्यात जमणारच नाही असं नसतं. पहिल्या वेळेस संभोग करतानाची भिती, काळजी, जागा कशी आहे, लवकर उरकायची घाई व अनेक कारणे असू शकतात.
मुलींच्या बाबतीत अनेकदा मैत्रिणींकडून किंवा इतर कोणाकडून चुकीची माहिती मिळाली की ‘संभोग म्हणजे वेदना’ असे समीकरण मुलींच्या मनात रुजून बसते. यामुळे काहीवेळा मुली संभोगावेळी पाय आखडून घेतात. त्यामुळे लिंग योनीमध्ये जायला अडचण येऊ शकते. भीतीपोटी योनीचे स्नायू आखडले जातात आणि त्यामुळे वेदना देखील होऊ शकतात.
तसेच लहानपणापासून लैंगिक अवयव झाकून असल्याने अचानक जोडीदारासमोर मोकळेपणा यायला वेळ लागू शकतो. त्यातून येणाऱ्या अवघडलेपणातून देखील संबंधांदरम्यान अडचण येऊ शकते. जोडीदारासोबत कम्फर्ट तयार झाला आणि मनातील भीती कमी झाली तर संभोग करणे सोयीचे जाऊ शकेल.
सेक्स मध्ये संभोगाइतकाच फोर प्ले खूप महत्वाचा आहे. फोर प्ले मुळे स्त्री पुरुष दोघांना लैंगिक उत्तेजना मिळते. लैंगिक इच्छा आणि उत्तेजना झाली की स्त्रीच्या योनीमार्गामध्ये एक स्राव पाझरतो त्यामुळे लिंग सुलभरीत्या योनी मध्ये जाऊ शकते.
मोकळेपणाने जोडीदाराशी याविषयी बोला. भीती किंवा अवघडलेपण नसेल आणि तरीही ही समस्या जाणवत असेल तर कृपया समुपदेशक किंवा सेक्सॉलॉजिस्ट यांची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 18 =