फोरप्ले (प्रणय)

4 14,302

आज आपण ‘फोरप्ले’ म्हणजे काय हे समजून घेऊ यात. एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’ म्हणतात. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही तर ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’ हा देखील सेक्सचाच भाग आहे. लैंगिक समाधानासाठी संभोगाइतकेच प्रणयाला देखील महत्व आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. त्यामुळे संभोगा आधी काही वेळ फोरप्ले करावा.

प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श  केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून सुख मिळते हे संवादातून समजू शकतं.

स्त्रियांना लैंगिक उत्तेजना मिळण्यामध्ये फोरप्ले खूप महत्वाचा असतो. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होत  नाही. योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते.

कोणतीही लैंगिक कृती करताना मग ती फोर प्ले असो अथवा संभोग, ती कशी करायची, कुठे करायची दोन्ही जोडीदारांनी मिळून ठरवावे. सर्वप्रथम तुमची आणि तुमच्या जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही विचार व्हायला पाहिजे. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. प्रणयासोबतच लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

 

4 Comments
 1. pravin says

  mazi ya aadhi kontich girlfriend navati….pan eka mulagi honar aahe..aani jevha aamhi romantic chatting karato tevha mazya penis madhun pani baher padate chikat chikat aani nantar mag mi hastmaithun kelyavar bar vatat. pani hya purvi pan yayacha pan kahi blue film pahile tarach kinva kamuk goshti pahile tarach.
  paani baher yene he chukiche aahe ka kinva roj roj chatting kartana pani yene kinva pani divasatun fakt chatting kartana jevha kamuk vruttine pani baher yene chukiche aahe ka. me jara confuse aahe ya babtit.

  1. I सोच says

   मित्रा, माणुस म्हटलं की सोबत भावना आल्याच. तुझ्या मनात कामूक विचार आल्यावर असं होणं साहाजिक आहे अन यात काहिच वाईट नाही. जो पर्यंत तुझ्या कुठल्याही कृती मुळे कुणाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास होत नाही व तुला छान वाटते आहे तर त्यात चुकिचे काहिच नाही. तुला तुझ्या नवीन रिलेशनशिप साठी खूप शुभेच्छा

 2. Sumit dipak kadam says

  सर माझी nd मज्या पार्टनर ची sex करायची खूप इच्छा असते but karyala gelo ki pani lagech pdt kiva Tila vr ghetl ki loose pdt sir plz suggest mi

  1. let's talk sexuality says

   ही बर्याच पुरुषांची अडचण आहे, पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे त्यासाठी पुढील लिंक पहा
   https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.