प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलगी / मुलगा virgin आहे हे कसं ओळखायचं ?

Sex kelyanantr mulinmadhe ky badal disun yeto??

1 उत्तर

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.
स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.अधिक माहितीसाठी खलील लिंक वरील लेख वाचा.

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
https://letstalksexuality.com/virginity/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 11 =