प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलाचे लग्नाचं योग्य वय कोणते?
1 उत्तर

कायद्यानुसार पुरुषांचं लग्नाचं वय भारतामध्ये २१ आहे. मात्र लग्न करण्यासाठी केवळ वय २१ असणं महत्वाचं नाही. लग्नानंतर येणार्‍या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक जबाबदार्‍या पुर्ण करण्याची तयारी असणं आवश्यक आहे. लग्न किंवा विवाह हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. शरीर संबंध ठेवणं ही जबाबदारीची गोष्ट आहे कारण यातून नविन जीव जन्माला येण्याची शक्यता असते. शिवाय लग्नांनंतर येणार्‍या इतर जबाबदार्‍य़ा पुर्ण करण्य़ासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं महत्वाचं असतं. लग्नापुर्वी लैंगिक सबंधांबाबत तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच फायद होईल. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी जबाबदार्‍या पुर्ण करण्यास सक्षम आहात असं वाटेल त्यावेळी(वय २१च्या पुढे) लग्न करणं योग्य असतं.

जोडीदाराच्या निवडीविषयी अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/choosing-a-partner/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 14 =