प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुली मुलांना प्रपोज करतात का
1 उत्तर

प्रत्येकाला भावना, आकर्षण असतं. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दतदेखील वेगळी असू शकते. आणि यात गैर काहीच नाही. मात्र समाजात एक मोठा गैरसमज आहे की मुलींनी प्रपोज केलं म्हणजे ती जास्तच चालू आहे, तिला सगळं कळलयं किंवा तिला प्रपोज करण्याचा अनुभव आहे वैगरे वैगरे… पण अशा गैरसमजूतींना काहीही अर्थ नाही. केवळ मुलींच्या लैंगिकतेवर हरेक प्रकारे बंधन टाकण्याच्या दृष्टीने पुरुषसत्ताक समाज व्यवस्था असे गैरसमज पसरवत असते. मुली देखील माणूस आहेत. त्यांना त्याचा भावना, प्रेम किंवा आकर्षणं असतात. मुलीदेखील प्रपोज करतात. प्रत्येकाची आवड वेगळी, गुण वेगळे, इच्छा वेगळ्या असू शकतात. पण तरीही सगळे जण समान आहेत. वेगळेपण मान्य करायला शिकूया. वैविध्य जपू या

याविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/category/gender-as-a-system/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 18 =