प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुले जसे हस्तमैथुन करतात तसे मूली काय करतात ?

मुलींना सेक्स करू वाटला तर त्या काय करतात जर सेक्स करायला कोणी नसेल तर

1 उत्तर

मुलांप्रमाणे मुलीदेखील हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे.शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. शरीरातील लैंगिकदृष्ट्या संवेदनशील अवयवांना स्पर्श करून मुली हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श केल्याने देखील लैंगिक उत्तेजना आणि सुख मिळते. स्त्रिया किंवा मुली हस्तमैथुन करताना क्लिटोरिसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात. याविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील खालील लिंक वरील मजकूर वाचा.  https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 13 =