लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण म्हणजे कुठला आजार असेल का? लहान मुलाना काहीतरी करेल असे वाटत असेल तर काय करावे?
लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटणं याला Pedophilia असं म्हटलं जातं. काहीजण याला लैंगिक कल, मानसिक आजार, मानसिक विकृती तर काहीजण मानसिक स्थिती म्हणत असतात. मुळात कोणतीही लैंगिक कृती ज्याने दुसऱ्याच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर ते चूकच आहे शिवाय तो कायद्याने गुन्हा आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण हा एक गंभीर प्रश्न आहे ज्याचे त्यांच्या एकूणच आयुष्यावर दूरगामी परिणाम होत असतात. त्यामुळे असं जर कुणी दिसून येवो किंवा न येवो मुलांना सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.
ज्यांना लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटतं त्यांनी एकाच्या मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्यावी.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील माहिती वाचा आणि मुस्कान संस्थेशी संपर्क साधा.
https://letstalksexuality.com/muskaan-helpline/
मुस्कान हेल्पलाईन:- + ९१ ९६८९०६२२०२
ईमेल: muskaanpune@gmail.com