आपल्या जोडीदाराशी बोला. संवाद वाढवा. त्यांना कशाचा त्रास होतो ते पहा आणि मग त्यावर उपाय शोधा. लिंगप्रवेशी संबंधात अनेकदा घर्षणातून वेदना होतात. खरे तर योनी मार्गातून स्त्रवणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. पण इच्छा नसणे, पुरेशी उत्तेजना न मिळणे या कारणामुळे हे स्त्राव तयार होत नाहीत आणि वेदना होतात. आनंददायी लैंगिक संबंधासाठी खाजगी जागा, निवांतपणा, स्वच्छता, इच्छा, तणावरहित मन, प्रेम, पुरेशी जवळीकता या अत्यावश्यक गोष्टीसोबातच फोर प्ले (जवळ घेणे, चुंबन, बातचीत, स्पर्श, मिठी ई) ह्या घटकाला कमालीचे महत्व आहे. तुम्ही या फोर प्लेसाठी किती वेळ देता? नसेल तर तसा वेळ द्या आणि पहा..
खाली काही लिंक्स देत आहोत त्यावरील लेख वाचा