प्रश्नोत्तरेलिग माेठे कसे करावे

2 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा लिंग मोठे का करायचे आहे ? यावर विचार करा. मोठे लिंग असले म्हणजे जास्त लैंगिक समाधान मिळते हा गैरसमज आहे. लिंगाच्या आकाराचा आणि लैंगिक समाधान किंवा गर्भधारणा याचा काहीही संबंध नाही.

प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 18 =