प्रश्नोत्तरेवृषाकोश
वृषाकोश asked 7 years ago

2 उत्तर
Answer for वृषाकोश answered 7 years ago

वृषण व बीजकोष

शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठेवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते.

शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूमुळे गर्भधारणा होऊ शकते. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात. बीजकोष हे जास्त संवेदनशील असतात. जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. आकुंचन आणि प्रसरण या क्रियांवर आपले नियंत्रण नसते. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते.

स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांच्या शरीराविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/male-body/

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 10 =